विशेष पोलीस महािनरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र
प्रिय विद्यार्थ्यांनो,
आजच्या डिजिटल युगात बालकांचे संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे. ‘बालकांचे संरक्षण, छळ, ट्रॅफिक नियम व सायबर सुरक्षाʼ या विषयांवरील हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. स्वतः चे संरक्षण करण्याची जाणीव निर्माण करणे आणि त्यासाठी सक्षम करणे ही काळाची गरज आहे.
जालना पोलीस विभागाने आश्रय शिबिरे, शिक्षक प्रशिक्षण आणि ‘दामिनी पथकʼ यांसारखे उपक्रम राबवून मुलांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे योगदान दिले आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतः ची सुरक्षा अधिक जागरूकतेने करू शकतील. या महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल आणि ते प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल जालना पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन! हे पुस्तक मुलांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूक करेल, असा विश्वास आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण भविष्यासाठी शुभेच्छा!आपला वीरेंद्र मिश्रा (IPS) विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात