ऑनलाइन छळ म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून इतरांचे फोटो, व्हिडिओ खोडसाळ पद्धतीने बदलून टाकणे, तुमच्यावर विचित्र शेरेबाजी किंवा शिवीगाळ करणे, अपमान करणे, तुमची प्रतिमा डागाळणे होय. जर कुणी तुमचा ऑनलाइन छळ करत असेल, तर तो तुमचा दोष नाही.
काळजी : ऑनलाइन छळ करणाऱ्याला ब्लॉक करा आणि पोलीसांकडे तक्रार करा.
प्रतिक्रिया : विश्वासार्ह वयस्कर व्यक्ती (पालक, शिक्षक किंवा सल्लागार) यांच्याकडून मदत घ्या.
काही लोक तुमचे फोटों एडिट करून किंवा मॉर्फ करून तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहचू शकते.
काळजी : तुमचे वैयक्तिक किंवा संवेदनशील फोटो ऑनलाइन शेअर करू नका.
प्रतिक्रिया : जर तुमचे फोटो मॉर्फ किवा बनावट करून पसरवले गेले, तर त्वरित ते प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा आणि विश्वासार्ह व्यक्तीला माहिती द्या.
तुमचा घराचा पत्ता, फोन नंबर, शाळेचे नाव आणि इतर खासगी माहिती शेअर करू नका. हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
काळजी : नेहमी तुमचा प्रोफाइल प्रायव्हेट ठेवा आणि गोपनीय माहिती शेअर करू नका.
प्रतिक्रिया : जर कोणी तुमच्याकडून गोपनीय माहिती किंवा वैयक्तिक मागत असेल, तर त्यांना नकार द्या आणि त्यांना ब्लॉक करा.
ऑनलाइन लैंगिक छळ म्हणजे अनावश्यक किंवा अश्लील संदेश, शेरेबाजी किंवा फोटो पाठवणे. कधीही अशा संवादात सहभागी होऊ नका किंवा तुमची कमजोरी, दोष सर्वांसमोर उघड करू नका.
काळजी : लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह संदेशांना प्रतिसाद देऊ नका. संवाद नेहमी आदरणीय ठेवा.
प्रतिक्रिया : लैंगिक छळाबाबत त्वरित सोशल मीडिया साईटला 'रिपोर्ट' करा आणि तुमच्या जवळच्या विश्वासार्ह व्यक्तीला माहिती द्या.
कधीही अज्ञात व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका किंवा संवाद साधू नका. ऑनलाइन तुम्ही सुरक्षित असलात तरी काही लोक तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात.
काळजी : फक्त तुमच्या ओळखीतल्या व्यक्तींचीच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा.
प्रतिक्रिया : अज्ञात व्यक्तींशी संवाद, चॅटिंग टाळा आणि त्यांना ब्लॉक करा
सोशल मीडियावर जास्त वेळ घालणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते.
काळजी : सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा त्याची मर्यादा ठरवा.
प्रतिक्रिया : इंटरनेट वापरातून वेळोवेळी ब्रेक घ्या आणि प्रत्यक्ष कामांमध्ये वेळ घालवा.
तुमचे छायाचित्र किंवा व्हिडिओ अनोळखी लोकांना पाठवणे खूप धोक्याचे आहे. यातून तुम्हाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते.
काळजी : तुमचे फोटो खासगी ठेवा आणि फक्त विश्वासार्ह व्यक्तींसोबतच शेअर करा.
प्रतिक्रिया : जर कोणी अश्लील फोटो मागितले किंवा तुमचे फोटो परवानगीशिवाय वापरले, तर त्यांना सोशल मीडियावर 'रिपोर्ट' करा आणि विश्वासार्ह व्यक्तीला माहिती द्या