🔹लॉटरी / सट्टेबाजी सारख्या 1 आकर्षक योजनांना बळी पडू नका : ❌
फसवणूक करणारे अनेकदा जलद पैसे कमावण्याचा, मोठ्या बक्षिसांच्या किंवा विशेष ऑफरच्या भूलथापांना आकर्षक पद्धतीने सादर करतात. अशा योजनांमध्ये कमी गुंतवणुकीत जादा नफा, विनामूल्य गिफ्ट, किंवा खात्यावर थेट पैसे जमा करण्याचे आमिष दाखवले जाते.
परंतु अशा योजना बहुतेक वेळा फसवणुकीच्या असतात.
🔹ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) शेअर करू नका! : ❌
OTP म्हणजे एक वेळ वापरण्यासाठी दिला जाणारा सुरक्षा कोड, जो बँकिंग व्यवहार, ऑनलाइन खरेदी किंवा खाते लॉगिनसाठी आवश्यक असतो. हा कोड फक्त तुम्हीच वापरावा आणि कोणासोबतही शेअर करू नये. फसवणूक करणारे बनावट कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे तुमच्याकडून ओटीपी घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
🔹APK लिंक / APP डाउनलोड करू नये. : ❌
फसवणूक करणारे आकर्षक ऑफर्स, बक्षिसे किंवा गरजेच्या अँप्सच्या नावाखाली बनावट APK लिंक पाठवतात. म्हणून, अनोळखी लिंक किंवा APK फाइल डाउनलोड करू नका. असे अँप्स तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस, मालवेअर किंवा स्पायवेअर इन्स्टॉल करू शकतात.
🔹बँक खाते क्रमांकाची माहिती, 4 पासवर्ड शेअर करू नका : ❌
बैंक, UPI अँप्स किंवा कोणतीही अधिकृत संस्था कधीही तुमचा पासवर्ड किंवा खाते तपशील विचारत नाही. जर कोणी तुमच्याकडून ही माहिती मागितली तर सावध व्हा आणि त्वरित अशा फसवणुकीची तकार करा. सुरक्षिततेसाठी पासवर्ड नियमितपणे बदलत रहा. सुरक्षेसाठी मोबाइल आणि बँक खात्यावर अलर्ट सुविधा सुरू ठेवा.
🔹"डिजिटल अटक" फसवणुकीला बळी पडू नका : ❌
सायबर गुन्हेगार स्वतःला पोलीस, सायबर सेल किंवा सरकारी अधिकारी म्हणून ओळख देऊन बनावट कॉल किंवा मेसेजद्वारे तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे सांगतात. ते तुम्हाला दंड भरायला सांगतात किंवा तुमची वैयक्तिक माहिती, ओटीपी, बँकेचा खाते क्रमांक व इतर तपशील मागतात.