वाहतूक नियमांचे महत्त्व

🔹सुरक्षा :

वाहतुकीचे नियम सर्व वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी बनवले आहेत हे नियम पाळल्याने आपण स्वतःला आणि इतरांना अपघातापासून वाचवू शकतो

🔹रस्त्यावरील सुरळीत वाहतूक :

जेव्हा प्रत्येक जण वाहतूक नियमाचे पालन करतो तेव्हा रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरळीतपणे चालते. यामुळे कोडी कमी होते, प्रवासाचा वेळ कमी होतो आणि सर्वांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता

🔹पर्यावरणाचे रक्षण होते :

वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजेच, वेगमर्यादा पाळणे आणि विनाकारण वाहन सुरू न ठेवणे यामुळे इंधनाची बचत होते, प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते

🔹जबाबदार समाजाची निर्मिती :

जेव्हा प्रत्येक जण वाहतूक नियमांचे पालन करतो, तेव्हा शिस्त आणि जबाबदारीचे भान सर्वांनाच येते. यातून सर्वांसाठीच सुरक्षित आणि जवाबदार समाज तयार होतो.