इंटरनेट वापरताना सुरक्षिततेचे उपाय

🔹URL नेहमी चेक करा : ✅

URL खात्रीशीर असल्याची तपासणी करा, ज्यामुळे तुमचा डेटा चोरीपासून वाचवता येईल.

उदाहरणार्थ : https://www.bank.com अशा प्रकारच्या कोणत्याही वेबसाइट वर जाण्याआधी https असेल तरच संबंधित वेबसाइट वर क्लिक करा.

🔹जाहिरातींपासून सावध राहावे : ✅

इंटरनेटवरील फसव्या जाहिरातींपासून जागरूक राहा. ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसे धोक्यात येऊ शकतात.

उदाहरणार्थ : आपण ५०% सवलत मिळवली आहे. अशी आकर्षक जाहिरात फसव्या ऑफरच्या रूपात असू शकते

🔹सुरक्षित पद्धतीनेच आर्थिक व्यवहार करावा : ✅

सुरक्षित पेमेंट म्हणजे एनक्रिप्टेड आणि संरक्षित आर्थिक व्यवहार, जे फसवणूक आणि अनधिकृत लॉगिनपासून संरक्षण देतात.

उदाहरणार्थ : Google Pay, PhonePe, आणि PayPal सारख्या सेवा सुरक्षित पेमेंट करतात. जेथे व्यवहार एन्क्रिप्टेड असतात आणि OTP किंवा UPI पिनद्वारे मंजुरी आवश्यक असते

🔹पासवर्ड अवघड /किचकट ठेवावा : ✅

बँक खात्यात लॉगिन करण्यासाठी आपला पासवर्ड अवघड, किचकट ठेवा. त्यात अक्षरे व आकड्यांची सरमिसळ करा. त्यात तुमची जन्मतारीख, गाडीचा नंबर किंवा नाव असे काहीही असू नये. असे पासवर्ड सहज तोडता येतात.

🔹विश्वसनीय वायफाय नेटवर्कचाच वापर करा : ✅

विश्वसनीय वायफाय नेटवर्क वापरणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा डेटा चोरी होणे आणि ऑनलाइन धोके टाळता पेऊ शकतात.

🔹संशयास्पद लिंकवर जाऊ नका : ✅

इंटरनेटवरील संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून सावध रहा. कारण त्यातून तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये व्हायरस किंवा मालवेअर येऊ शकते.

🔹विश्वसनीय अँपचा वापर करावा : ✅

मोबाइलवर फक्त विश्वसनीय अँप्सचाच वापर करावा, कारण अनधिकृत अँप्स तुमच्या गोपनीयतेला धोका पोहोचवू शकतात