TEENS

[ Teachers Educating, Empowering & Nurturing Students ]

जालना पोलिसांनी जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब, जालना यांच्या सहकार्याने TEENS (Teachers Educating, Empowering, and Nurturing Students) हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम राज्यस्तरीय पोलीस काका, पोलीस दीदी योजनेचा विस्तार असून विद्यार्थ्यांचे शिक्षण व सबलीकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

POCSO कायद्याशी संबंधित आकडेवारीच्या अभ्यासातून किशोरवयीन मुलांमधील परस्परसंमतीने होणारे संबंध आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार यासारख्या समस्यांकडे आमचे लक्ष वेधले गेले.

याच पार्श्वभूमीवर TEENS उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शिक्षकांना POCSO कायदा, किशोरवयीन मानसशास्त्र आणि सायबर गुन्हे यासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले जाते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी पहिले मार्गदर्शक व मदतनीस म्हणून कार्य करावे आणि लैंगिक अत्याचाराचे संभाव्य बळी ठरणाऱ्या मुलांना मदत करावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

1000

शिक्षकांना प्रशिक्षण

65,000

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

600

शाळांमध्ये पोहोच
Image_1
Image_2