Profile Picture

अजय कुमार बंसल (IPS)

पोलीस अधीक्षक जालना

मनोगत

प्रिय विद्यार्थ्यांनो,

आजच्या डिजिटल व वेगाने बदलणाऱ्या काळात लहान मुलांचे संरक्षण अतिशय महत्त्वाचे झाले आहे. 'बालकांचे संरक्षण, छळ, ट्रॅफिक नियम व सायबर सुरक्षा' या विषयावरील हे पुस्तक मुलांसाठी अमोल मार्गदर्शक ठरेल. मुलांची सुरक्षितता पोलीस विभागासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.

जालना पोलीस विभागाने मुलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. यात आश्रय शिबिरे, शिक्षक प्रशिक्षण आणि 'दामिनी पथक' यांसारखे महत्त्वपूर्ण उपक्रम आहेत. मुलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि वेगवेगळे धोके कसे टाळावे हे यातून शिकवले जाते.

सर्वांना सुरक्षित आणि तणावमुक्त जीवन देण्याचे आमचे शंभर टक्के प्रामाणिक वचन आहे. या पुस्तकामुळे मुलांना त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजेल, अशी आशा आहे.

आपला
अजय कुमार बंसल (IPS)
पोलीस अधीक्षक, जालना